file photo 
नांदेड

हॉटेल, बारमधील कामागारांची कोरोना तपासणी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बारमधील कामगारांची फिरत्या पथकामार्फत तपासणी करण्याचे  निर्देश  जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर  यांनी  दिले आहेत. एखादा  कामगार कोरोना बाधित असेल तर  त्याच्यापासून  ग्राहकांना कोरोना विषाणुची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश सर्व संबंधित विभागप्रमुखांना त्यांनी दिले. 

पर्यटन विभागाने केलेल्या मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत पालन करुन 50 टक्के क्षमतेने  हॉटेल्स, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतू त्याठिकाणी प्रवेश देतांना ग्राहकाचे तापमान व थर्मल स्क्रिनिंग करुनच लक्षणे नसलेल्या ग्राहकांना प्रवेश द्यावा हे बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाकारुन अशा बाधितांची  तपशिलासह स्वतंत्र नोंदणी करुन असे तपशील आरोग्य विभाग व प्रशासनास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश ऑक्टोंबर पासून लागू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात 9 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 9 ऑक्टोंबर 2020 चे 06.00 वाजेपासून ते दिनांक 23 ऑक्टोंबर 2020 चे मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT