File photo
File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात रविवारी एकाचा मृत्यू तर १६ अहवाल पॉझिटिव्ह

प्रमोद चौधरी

नांदेड: जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज कमी-जास्त होत आहे. रविवारी (ता.१३) प्राप्त अहवालामध्ये १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, २३ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर एकाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.

रविवारी (ता. १३) सायंकाळी ५८१ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये १६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २३ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच चौफाळा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची एकूण संख्या ५६० इतकी झाली आहे. १६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचेही डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.  रविवारी चौफाळा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, एकूण संख्या ५६० इतकी झाली आहे.

रविवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - एक, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - १०, खासगी रुग्णालय - सात, जिल्हा रुग्णालय - ०४, हदगाव - एक  असे एकूण २३ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तसेच रविवारी बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात नऊ, हिंगोली - दोन,  कंधार - एक, नायगाव - एक, हदगाव - एक, मुदखेड - एक आणि नागपूर - एक असे एकूण १६ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. 

जिल्ह्यात सद्यस्थितीत ३१५ कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २६, जिल्हा रुग्णालय ३३, जिल्हा रुग्णालय नवी इमारत १४, मुखेड सहा, देगलूर - पाच, हदगाव - पाच, किनवट - तीन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३२, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १६५, हैदराबाद येथे संदर्भित - एक आणि खासगी रुग्णालयात २६ असे एकूण ३१५ कोरोना बाधीत रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.   
 
नांदेड कोरोना मीटर 

  • रविवारी पॉझिटिव्ह - १६ 
  • रविवारी बरे झालेले रुग्ण - २३ 
  • रविवारी मृत्यू - एक 
  • एकूण पॉझिटिव्ह - २० हजार ८४५ 
  • एकूण बरे - १९ हजार ७७४ 
  • एकूण मृत्यू - ५६०
  • प्रलंबित स्वॅब - ४३५ 
  • अतिगंभीर रुग्ण - १६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT