file Photo
file Photo 
नांदेड

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के, शनिवारी ३५ रुग्ण कोरोनामुत्त; ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण जितके कमी होते, त्याच प्रमाणात रुग्णांची संख्या वाढते असे चित्र आहे. शनिवारी (ता.नऊ) प्राप्त झालेल्या ९०५ अहवालापैकी ८४५ निगेटिव्ह, ४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा हा डाव सुरू असून, कोरोना आजारातुन बरे होण्याचे प्रमाण हे मागील अनेक दिवसापासून ९४ टक्क्यापेक्षा पुढे गेल्याचे दिसून येत नाही. 

शनिवारी दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयात एक, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरणात असलेले - २५, माहूर - एक, देगलूर - तीन व खासगी रुग्णालयातील पाच असे ३५ रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत उपचार घेऊन २० हजार ६७३ रुग्ण घरी परतले आहेत. 

जिल्हाभरातील आतापर्यंत ५७८ बाधितांचा मृत्यू

 श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित गंभीर रुग्णांपैकी शनिवारी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील महिला (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरातील आतापर्यंत ५७८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

शनिवारी उशिरापर्यंत ३९५ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु 

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २६, नांदेड ग्रामीण - दोन, मुखेड - दोन, लोहा - चार, कंधार दोन, अर्धापूर - तीन, हदगाव- एक, आदिलाबाद - एक, बिलोली - एक, भोकर - एक व परभणी एक असे ४४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८१६ इतकी झाली आहे. सध्या ३५४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील दहा कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ संशयित स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ८१६ 
एकूण बरे - २० हजार ६७३ 
एकूण मृत्यू - ५७७ 
शनिवारी पॉझिटिव्ह - ४४ 
शनिवारी बरे - ३५ 
शनिवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ३६४ 
गंभीर रुग्ण - दहा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT