goyal.jpg
goyal.jpg 
नांदेड

किनवटमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

मिलींद सर्पे


किनवट, (जि. नांदेड) ः उपविभाग किनवटअंतर्गत दोन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. देहली तांडा व वडसा ही रुग्णांची गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

आरोग्य विभागातील पथकाद्वारे तपासणी
निवासासाठी परजिल्ह्यातून आलेली व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअर्थी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी या परिसरात कलम १४४ लागू केले आहे. दहेली तांडा व वडसा गावाच्या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही. तसेच गावातील दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तसेच उपरोक्त प्रमाणे घोषित केलेल्या झोनमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशीलवार धोरण व करावयाचे उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले असून त्या बाबत आरोग्य विभागाने सुद्धा प्रमाणित कार्यपद्धती जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने सदर झोनमध्ये विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने करावे. या ठिकाणच्या सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी डॉ. संदीप जाधव यांचे वैद्यकीय पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी नियुक्त केले आहे. सदर क्षेत्राच्या चेक पोस्ट प्रवेश व निर्गमन ठिकाणांवर आरोग्य विभागातील पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू लागन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तत्काळ शोध घेणे आणि वैद्यकीय पथकाने निर्देशाप्रमाणे गृह विलगीकरणासह संस्थात्मक विलगीकरण करून इतर वैद्यकीय कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


बाधित रुग्णाच्या गावाला भेट देऊन पाहणी 
ज्यांना गृह विलगीकरण केलेले आहे त्या व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात यावा. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे उपरोक्त परिसरांची संपूर्ण स्वच्छता करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत. या रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाइलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. जेणे करून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे व गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी बाधित रुग्णाच्या गावाला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT