file photo 
नांदेड

कोरोना : माळाकोळीतील वृद्धेच्या मृत्युनंतर अहवाल पाॅझिटिव्ह, परिसरात खळबळ

एकनाथ तिडके

माळाकोळी (ता. लोहा) : माळाकोळी येथील 63 वर्षीय महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. श्वसनाचा त्रास व ताप आल्यामुळे नांदेड   येथे उपचारासाठी दोन दिवसापुर्वी दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. यावेळी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे कोरोना चाचणी केली असता मृत्युनंतर कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले असुन माळाकोळीत उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

माळाकोळी येथील प्रतिष्ठीत कुटुंबातील महिला वय 63 वर्षीय यांना मागील दोन दिवसांपासुन श्वसनास त्रास, ताप येणे असा त्रास होत असल्यामुळे गावातील खाजगी रुग्णालयात प्राथमीक उपचार करुन नांदेड येथे दाखल करण्यात आले. प्रारंभी नांदेड येथे खाजगी रुगणालयात दाखल केल्यानंतर तेथील डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान  तिचा मृत्यु झाला असुन मृत्युनंतर तिचा कोरोना अहवाल पाॅजीटिव्ह आला आहे. 

घरी आलेल्या पाहुणीमुळे ही बाधा झाली असावी असा प्राथमीक अंदाज

मागील काही दिवसांपुर्वी माळाकोळी येथील पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी व एक अधिकारी कोरोणा पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर अनेकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र सदर महिलेला कोरोना विषाणुची बाधा कशी झाली याबाबत अधिक माहीती मिळु शकली नाही. यासंदर्भाने प्रसासन चौकशी करत आहे. घरी आलेल्या पाहुणीमुळे ही बाधा झाली असावी असा प्राथमीक अंदाज असल्याचे वैद्यकीय अधिकारी श्री धनगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले आहे. कुटुंबातील ईतर सदस्य व शेजारी यांचे स्वॅब घेतले जात असुन काहिंना क्वाॅरंटाईन करणार    असल्याचे आरोग्य विभागाकडुन समजले. 

तीन दिवस कडक लाॅकडाऊन पाळला जाणार 

दरम्यान रात्री उशिरा तालुका आरोग्य अधिकारी प्रविण मुंडे, माळाकोळीतील वैद्यकीय अधिकारी डाॅ धनगे यांनी भेट देऊन संबंधीत भाग प्रतिबंधीत   क्षेत्र म्हणुन जाहीर करत ईतर उपाययोजनांना सुरुवात केली. यामध्ये संबंधीत कुटुंबातील व शेजारी घरांतील सदस्यांना क्वाॅरंटाईन करणे, स्वॅब घेणे व  परिसर निर्जंतुकीकरण करणे आदी बाबींचा समावेश आहे. ग्रामपंचायत कार्यालय माळाकोळीच्या वतीने सदर परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन गावात पुढील तीन दिवस कडक लाॅकडाऊन पाळला जाणार असल्याची माहीती ग्राम विकास अधिकारी सी. के. दावनगावे व सरपंच चंद्रमुनी  मस्के यांनी दिली आहे. कोरोना विषाणु संसर्गामुळे माळाकोळी येथील महिलेचा मृत्यु झाला असुन गावातील नागरीकांनी घाबरुन न जाता सतर्क राहुन    प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे, कडक लाॅकडाऊन पाळुन तसेच संपर्कात आलेल्यांनी स्वत: हुन क्वाॅरंटाईन व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT