नांदेड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात
नांदेड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी (ता. एक) जूलै रोजी प्राप्त झालेल्या 1 हजार 622 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 247 एवढी झाली असून यातील 88 हजार 632 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 117 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 7 बाधित आढळले.

हेही वाचा - जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची एक मात्रा कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी

जिल्ह्यातील 20 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 7, खाजगी रुग्णालयातील 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

117 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 55, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 138 खाटा उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT