File Photo
File Photo 
नांदेड

Corona Update ः नांदेडमध्ये आज पुन्हा पाच पॉझिटिव्ह, संख्या गेली २०८ वर 

शिवचरण वावळे

नांदेड : बुधवारी (ता.दहा) दिवसभरात दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढत जाणारा हा आकडा कुठेतरी थांबेल असे वाटत असतानाच गुरुवारी (ता. ११ जून) सकाळी पुन्हा पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

नांदेडमधील कोरोना बाधीत रुग्णसंख्या ही २०८ इतकी झाली आहे. गुरुवारी (ता.११ जून) आढळुन आलेले रुग्ण इतवारा भागातील २८ आणि ६५ वर्षे वयाचे दोन पुरुष, ख्वाजा कॉलनी येथील एक ६७ वर्षीय पुरुष, फरांदेनगरातील ५२ वर्षीय व्यक्ती आणि चौफाळा येथील ५२ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. रोज नव्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे इतके दिवस ‘कोरोना’ असे नाव घेतले तरी घरात बसणारे नांदेडकर आता मात्र बिनधास्तपणे शहरातील रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत.  लहान मोठ्या दुकानावर देखील सॅनिटायझर किंवा समांतर अंतर राखले जात नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.  

कन्टेटमेंट झोन नावालाच

ज्या भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला, तो भाग सील केला जातो. इतवारा, अबचलनगर, पीरबुऱ्हाणनगर येथे सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे सुरुवातीच्या काळात कंटेन्टमेंट झोन एरीयामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय त्या घराच्या व परिसराचा एरीया बंद करण्यात येत होता. त्यामुळे त्या परिसरातील कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे आरोग्य विभागाला देखील सर्व परिसरातील नागरीकांची आरोग्य तपासणी करणे सहज शक्य होत असे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरातील कंटेन्टमेंट झोन हा नावालाच केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कारण, कन्टेटमेंट झोनमधीलच अनेक नागरिकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत.    

६० रुग्णावर उपचार सुरु

नव्याने बाधित झालेल्या यातील दोन रुग्णावर एनआरआय यात्रीनिवास, दोन रुग्णावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर एका रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत बाधित व्यक्तींची संख्या २०८ इतकी तर उपचारा दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाल्याचे नोंद झाली आहे. याशिवाय १३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ६० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

Life on Earth is in Danger: आता शेवटच्या टप्प्यात! पृथ्वीवरुन मानव कधी होणार नष्ट? खळबळजनक माहिती समोर

Latest Marathi News Live Update : PM मोदी आणि अमित शाह मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर घाबरले; मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका

Narendra Dabholkar Case Live Updates: आज दाभोळकर प्रकरणी जो निर्णय दिला, त्याबद्दल आम्ही आभार मानतो - सनातन संस्था

SCROLL FOR NEXT