corona sakal
नांदेड

कोरोना अपडेट: नांदेडमध्ये आज दोन कोरोनाबाधितांची भर

दोन झाले बरे; २३ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३१) प्राप्त झालेल्या एक हजार ४० अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे दोन अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार ७४२ एवढी झाली असून यातील ८८ हजार ५८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला २३ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६१ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसआर तपासणीद्वारे मुदखेड येथे एक व उमरीत एक असे एकुण दोन बाधित आढळले आहेत. आज जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. यात महापालिका अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

सध्या २३ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी सात, किनवट कोविड रुग्णालयात एक, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणात सात, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात आठ व्यक्ती उपचार घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२८ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १४५ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. - डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.

नांदेड कोरोना मीटर

एकुण स्वॅब- ७ लाख १० हजार ६३४

एकुण निगेटिव्ह - ६ लाख ७ हजार ६३५

एकुण बाधित - ९० हजार ७४२

एकूण बरे - ८८ हजार ५८

एकुण मृत्यू - २ हजार ६६१

मंगळवारी बाधित - दोन

मंगळवारी बरे - दोन

मंगळवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरू -२३

अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT