file photo 
नांदेड

नांदेड शहराच्या हनुमान गड परिसरात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिका आणि अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती सेवा संघाचे सुनिल डोईजड यांच्या संयुक्त पुढाकारातून हनुमान गड परिसरातील नागरिकांसाठी हनुमान गड मंदिरासमोर सोमवार  (ता. १२) एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, हनुमानगड परिसराच्या अधीक्षक डॉ. कोटलवार व अजितपाल संधू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सुनील डोईजड यांनी गतवर्षीही पुढाकार घेत सर्वप्रथम आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट किटचा पुरवठा केला होता.
सोमवार (ता. 12) रोजी सकाळी ११ ते तीन या दरम्यान सुरु होणाऱ्या या कोरोना लसीकरण मोहिमेत हनुमान गड परिसरातील नागरिकांनी आपली नावे नोंदवावीत व लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लसीकरण मोहिमेचे मुख्य आयोजक सुनील डोईजड यांनी केले आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सुनील डोईजड मित्रमंडळाचे उद्योजक आशिष बियाणी, संदीपसिंग गाडीवाले, राहुल सरपाते, प्रतिक चन्नावार, कपिल पोकर्णा, शैलेश मुखेडकर, संतोष औंढेकर, सचिन गुरवले, सतीश गोविंदवार, सोहेल मोमीन व वसंत सोनाळे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT