Soybean Crop  sakal
नांदेड

Nanded : कापसाच्या झाल्या वाती; सोयाबीनला कोंब

शेतकऱ्यांची वाढली चिंता; दिवाळीच्या मुहुर्तावर पिकांची माती

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कपाशीला भाव बघता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशी व सोयाबीन लागवड झाली आहे. मात्र, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. या पावसाने शेतात कापसाच्या वाती झाल्या तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली असून ऐन दिवाळीत त्यांचे स्वप्न मातीमोल झाले आहे.

जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्याने आणि गेले दोन वर्षांत मिळालेले चांगले दर पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटी कपाशीची पूर्व हंगामी लागवड केली होती. परिणामी जिल्ह्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. सोबत शेतकऱ्यांनी सोयाबीनलाही पसंती दिली.

काही प्रमाणात असलेल्या मूग, उडीद पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा कापूस, सोयाबीनवर होत्या. परंतु, संततधार सुरु असलेल्या पावसाने कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. आॅक्टोबर उजाडला असल्याने शेतात कपासी फुटली आहे. त्या कपाशीच्या पावसामुळे वाती होताना दिसत असून, फुटलेला कापूस पावसामुळे खाली पडून पीक मातीत मिसळत आहे.

या वर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात होती. त्यामुळे यावर्षी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याचे स्वप्न शेतकरी रंगवित होता. मात्र, त्याच्या या स्वप्नांवर परतीच्या पावसाने वरवंटा फिरविला. गेले चार वर्ष दुष्काळावर मात करताना कर्जबाजारी व प्रसंगी सोने बॅंक, खासगी सोनाराकडे गहाण ठेवून आपला प्रपंच भागविणाऱ्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने फटका बसला असल्याने तो मानसिकरित्या खचला.

पीक विम्यातून मीठ चोळण्याचे काम

शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन चांगले राहावे यासाठी शासन विविध उपाययोजना आखत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने विविध शेती उपयोगी निर्णय घेतले. मात्र, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना कोणत्याही प्रकारची मदत किंवा पिकविमा अद्याप मंजुर झालेला नाही. हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करण्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

मी पाच एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. कपाशी लागवड केली. मात्र, परतीच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून शासनाने शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी.

- श्यामराव भुमे पाटील, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT