File photo 
नांदेड

Video - देशाला आहे कुशल मनुष्यबळाची गरज - डॉ. हनुमंत भोपाळे 

प्रमोद चौधरी

नांदेड : जगाची, देशाची गरज लक्षात घेऊन कुशल आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण केले तर निश्चितच अनेक प्रश्रांची उकल सहजपणे होऊ शकते. सक्षम आणि कुशल मनुष्यबळ देशाला उन्नत करत असते. असं मनुष्य बळ निर्माण करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे. वैज्ञानिक आणि सकारात्मक दृष्टिकोन रूजवला पाहिजे. यामुळे अंधश्रद्धाळू आणि नकारात्मक मनुष्यबळ तयार होणार नाही.

अंधश्रध्द माणसं आपल्या विकासाच्या अपेक्षेने हाताच्या रेषा दाखवत बसतात. अशानं विकास होत नाही. अशा अंधश्रद्धा प्रकारामुळे हताश होऊन बसण्याची वेळ मात्र येते. प्रश्नांची योग्य उकल झाल्याशिवाय विकास गतिमान होऊ शकत नाही. प्रश्र्न सोडविण्याचे कौशल्य शिकवले पाहिजे. प्रश्न सोडविणारे विकास करतात अन् विकास करणारे माणसं कोणत्याही देशाचे वैभव असते. दगडं नाही तर माणसंच देशाच्या वैभवाची निर्मिती करण्यात मोलाची भूमिका बजावतात. म्हणून माणसं घडविण्यासाठी दर्जेदार स्वरूपाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची गरज आहे.

आज जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची आपल्या देशात फार मोठी उणीव आहे. ती भरून काढण्यासाठी जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची निर्मिती केली पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञानच देऊन थांबलो तर विकासाची प्रक्रिया गतिमान होणार नाही. कसं पोहायला पाहिजे, यावरचे धडे पाठ करून शंभर पैकी शंभर मार्क घेणा-या विद्यार्थ्यांना पोहताच येत नसेल तर या मार्काचा काय उपयोग? 

भावना हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले, तसं त्यांना प्रशिक्षण दिले तर भावनिक बुद्धिवान विद्यार्थी तयार होतील. ते मनानं प्रसन्न, आनंदी आणि समाधानी असतील. त्यांच्या रोमारोमात उत्साह, आत्मविश्वास आणि कार्यमग्नता दिसून येईल. भावनिक बुद्धिमत्ता संपादन केलेली माणसं समाजाला दुःख मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात.  प्रश्न सोडवण्यासाठी तरबेजपणा यावा यासाठी प्रयोगशील, उपक्रमशील, दर्जेदार  शिक्षण आणि प्रशिक्षण असायला पाहिजे. 

समस्यांची जाणीव होताच ती समस्या कशी सोडवता येईल या अनुषंगाने डोकं लढवणारी माणसं असतील तर नक्कीच समस्यांची सोडवणूक होते. त्यासाठी केवळ मार्कासाठी शिक्षण घेणारे आणि मार्क सीट देणारे म्हणजेच प्रमाणपत्र वाटप करणारी महाविद्यालयं, विद्यापीठं जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत. असे होऊ यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने यासंदर्भात  विचार करून उपकारक उपक्रम राबविले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT