Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

Konkan MLC election : कोकण विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. यामुळे तटकरेंचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा आहे.
Konkan MLC Bala Mane

Konkan MLC Bala Mane

esakal

Updated on

Bala Mane withdraws nomination : कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड समोर आली आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र अचानक बदलले आहे. दरम्यान, त्यांच्या माघारीनंतर थेट ठाकरे बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. माने यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थक उमेदवार अनिकेत तटकरे यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. या घडामोडीमागे मंत्री नितेश राणे यांच्या राजकीय हालचालींची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com