file photo 
नांदेड

दहावी बारावी परीक्षेसाठी आता कोवीडची लस किंवा निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

प्रल्हाद कांबळे

नांदेड : इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी व परिक्षार्थ्यांनाकोवीडची लस टोचून घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र ४८ तासासाठी वैध असेल ते जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ता. पाच एप्रिल रोजी संयुक्तपणे जारी केले आहेत.

सदर आदेशाची प्रत जिल्हा परिषद हायस्कूल, समाज कल्याण अंतर्गत आश्रम शाळा, सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत ता. ३० एप्रिलपर्यंत शाळा, कॉलेज बंद आहेत. शासनाच्या महसूल व वनविभाग आपत्ती व्यवस्थापन विभागाने ता. चार एप्रिल 2019 रोजीच्या एका आदेशान्वये तसे कळविले आहे.

तसेच राज्य मंडळ पुणे यांच्या निर्देशानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ता. २३ एप्रिलपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ता. २९ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यामुळे सदर परीक्षेच्या कामाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी यांना ब्रेक द चैनमधून सूट देण्यात आली आहे. दहावी- बारावी परीक्षे संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी यांना कोवीडची लस टोचून घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असलेले प्रमाणपत्र ४८ तासासाठी वैध असेल ते जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेशात म्हंटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT