नांदेड : गुन्हे शाखेकडून सहा दुचाकी जप्त  sakal
नांदेड

नांदेड : गुन्हे शाखेकडून सहा दुचाकी जप्त

एका चोरट्यासह विधीसंघर्ष बालक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या पाच दुचाकी आणि नायगाव येथून चोरीला गेलेली एक अशा सहा गाड्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता.१२) जप्त केल्या आहेत. एक चोरटा नांदेड ग्रामीण आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक नायगाव पोलिसांकडे दुचाकींसह स्वाधीन करण्यात आले आहेत.

मागील काही महिन्यात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. दररोज शहरासह ग्रामीण भागातून अनेक दुचाकी चोरीस जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झालेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या विभागातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस अंमलदार संजय केंद्रे, संग्राम केंद्रे, पद्मसिंह कांबळे, रुपेश दासरवार, हेमवती भोयर, बालाजी यादगिरवाड, गणेश धुमाळ आणि चालक हेमंत बिचकेवार यांना पंचशीलनगर एमआयडीसी सिडको येथे पाठवले.

या पथकाने तेथे रोहित प्रल्हाद कांबळे (वय २४) याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले. रोहित कांबळे याने नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत पाच तर विधीसंघर्षग्रस्त आरोपीने नायगाव येथून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार रोहितला पाच दुचाकींसह नांदेड ग्रामीणच्या स्वाधीन केले तर विधी संघर्षग्रस्त बालकाला एका दुचाकीसह नायगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सर्व दुचाकींची किंमत एक लाख ९० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT