crime news crime news
नांदेड

सासूचा खून करून जावयाची गळफास घेऊन आत्महत्या

पती पत्नीमध्ये वाद होत असल्याने मोहिनी माहेरी आली होती. त्यानंतर श्रीकांत तिला परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र सासू मालिनी पाठविण्यास तयार नव्हती

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: पत्नीला सासरी नांदविण्यास पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासूच्या डोक्यात दगडी जाते मारून खून केला आणि त्यानंतर जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील तरोडा भागातील भावसार नगरात रविवारी (ता. चार) रात्री अकराच्या दरम्यान घडली असून याबाबत सोमवारी (ता. पाच) भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरोडा खुर्द भागातील भावसार नगरात मालिनी विजयकुमार भायेकर (वय ५६) राहतात. त्यांची मुलगी मोहिनी हिचा सहा वर्षापूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाड याच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला. मोहिनी लातूरला एका खासगी बॅंकेत तर श्रीकांत तिथेच लातूरला एका हॉस्टेलवर वार्डन म्हणून काम करत होता. लॉकडाउनमध्ये श्रीकांतची नोकरी गेल्याने त्याला दारूचे व्यसन लागले होते.

पती पत्नीमध्ये वाद होत असल्याने मोहिनी माहेरी आली होती. त्यानंतर श्रीकांत तिला परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र सासू मालिनी पाठविण्यास तयार नव्हती. त्यामुळे मालिनी रविवारी रात्री घरी एकट्या असल्याचे कळाल्यानंतर मनात राग धरून श्रीकांतने त्यांच्या डोक्यात जाते मारून त्यांचा खून केला. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन श्रीकांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मोहिनी नातेवाईकांकडे गेली असल्याने ती बचावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरील घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भाग्यनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी चक्रधर विजयकुमार भायेकर (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंखे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; १८ दिवसांची तहान भागणार

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

Marathi Live Updates : नेरुळमध्ये झाड कोसळल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

मुंबईत पावसाच्या पाण्यात करंटचा धक्का, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; तुम्ही कशी काळजी घ्याल? घराबाहेर पडण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT