पोलीस  sakal
नांदेड

Crime news : गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही़, एक गावठी पिस्टल जप्त

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रेमी युगुलावर गोळीबार करून लुटणा-या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडील एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता. ११) सायंकाळी दिली.

असदवन शिवारात ग्रामिण तंत्रनिकेतनच्या पाठीमागे ता. तीन मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास एका प्रेमी युगुलावर चोरटयांनी गोळीबार करून चांदीची चेन व नगदी दोन हजार रूपये चोरुन नेले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयातील आरोपींना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक व्दारकादास चिखलीकर यांना आदेश दिले होते.

त्यानुसार त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून शोध सुरु केला होता. दरम्यान, मंगळवारी (ता. ११) पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गुन्हयातील आरोपी ग्रामीण तंत्रनिकेतन ते वाघाळा, नांदेड जाणा-या रस्त्यालगतच्या पाण्याच्या टाकीखाली बसलेले आहेत.

त्यावरून पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि राजेंद्र अरुणसिंह ठाकुर (वय ३२), अतिष जिवनसिंह ठाकुर ( वय २२, दोघेही रा. आकाशनगर, असदवन, विष्णुपुरी, नांदेड) आणि श्रीपाद ऊर्फ पियुष सुधाकर कदम ( वय १९, रा. वसमत, जि. हिंगोली, हल्ली मु्क्काम असदवन) या तिघांना पथकाने ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आरोपी राजेंद्र ठाकुर याने गुन्हा करताना वापरलेली २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या तिघांना पुढील तपासकामी ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. या तीन आरोपीताकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व्दारकादास चिखलीकर, सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने, फौजदार सचिन सोनवणे, जसवंतसिंघ शाहु, माधव केंद्रे, कर्मचारी देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, चालक अर्जुन शिंदे व सायबर विभागाचे राजु सिटीकर यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT