Crime News sakal
नांदेड

दगडफेक प्रकरणात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील विविध भागात शुक्रवारी (ता.१२) दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी वजीराबाद, शिवाजीनगर व इतवारा पोलिस ठाण्यात ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, चौघांना ताब्यात घेतले आहे.त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद शुक्रवारी नांदेड शहरात उमटले. यामध्ये जमावाने शिवाजीनगर, डाॅक्टर लेन, देगलूर नाका परिसरात दगडफेक करून अनेक दुकानांचे व वाहनांचे नुकसान केले. तर केलेल्या दगडफेकीत इतवारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शिवाजीनगर भागातील मिठाई दुकान, एक ट्रेडर्सवर दगडफेक करण्यात आली. तसेच डाॅक्टर लेन परिसरात अॅटो (एमएच-२६, जी-४२६२)ची काच फोडून नुकसान केले व महापालिकेच्या मालकिचे असलेले पथदिवे फोडण्यात आले. यामध्ये सुमारे सात हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. देगलूर नाका मार्गावर एक दुचाकी जाळून अनेक वाहनांवर दगडफेक करून नुकसाने करण्यात आले. याप्रकरणी वजीराबाद पोलिसांनी आठ, शिवाजीनगर पोलिसांनी १४ व इतवारा पोलिसांनी २२ गुन्हे ३०० ते ४०० जणांविरुद्ध दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT