अर्धापूरता (जि.नांदेड) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.  सकाळ
नांदेड

पावसाने ओढ दिल्याने पिके व्हेंटीलेटरवर, जमिनीला पडल्या भेगा

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूरता (जि.नांदेड) : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपांच्या पिकांची (Kharip Crops) अवस्था नाजुक झाली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने पिके माना टाकत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी तुषार, ठिबक सिंचनाने (Irrigation) पिकांना पाणी देऊन ती वाचविण्यासाठी प्रयत्न करित आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास खरिपांच्या पिकांवर परिणाम होवून उत्पादन कमी होण्याची (Nanded) शक्यता आहे. तर श्रावण सरी न पडता अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पावसाळ्यात  उन्हाळा अनुभवावा लागत आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये पेरण्या झाल्यावर काही ठराविक अंतराने पाऊस झाल्याने प्राथमिक अवस्थेत पिकांची चांगली वाढ झाली. सध्या सोयाबीनला (Soybean) फुले कापसाला फुलंपाती लागत आहेत. सध्या सर्वच पिकांना पाण्याची गरज आहे. तालुक्यात (Ardhapur) वार्षिक सरारीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे.

पण सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. याचा परिणाम पिकांच्य वाढीवर होत आहे. तालुका यंदाच्या हंगामात सर्वाधिक पेरा सोयबीनचा असून त्या खालोखाल हळद, कापूस आदी पिकांचा आहे. सोयाबीन फुलोरा व काही भागात शेंगा लागत आहेत. अशा नाजुक परिस्थितीत पाण्याची गरज असते. नेमक्या वेळी पाऊस रूसल्याने पिके व्हेंटिलेटरवर गेली आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. साधारणपणे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पाऊस हमखास बरसतो. ऑगस्ट सुरू होऊन आठवडा झाला आहे. तसेच श्रावण सुरू झाला आहे. श्रावण सरी बरसण्या आधीच उष्णात वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. पावसाळ्यात उन्हाळा अनुभवावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT