Nanded News 
नांदेड

नांदेडमध्ये लॉकडाउनच्या भीतीने रस्त्यावर गर्दी, खरेदीसाठी धुम   

प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कठोर उपाययोजना म्हणून बुधवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून ता. चार एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाउन लागू केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत सुरू राहणार आहेत. 

मात्र, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता भीतीने नांदेडकरांनी मंगळवारी (ता.२३) बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. रस्त्यांवर वाहनांची गर्दी व बाजारपेठेत खरेदीसाठी धुम सुरू असताना कोरोना प्रतिबंध उपाययोजनांची ऐशीतैशी होताना दिसून आली. ही गर्दी टाळण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. 

प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधींचीही काही दुकाने सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दूध विक्रीला सकाळी वेळ देण्यात आली आहे. रुग्णालये व संलग्नित औषधांची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. गर्दी अशीच वाढत राहली तर ज्या उद्देशाने लॉकडाउन करण्यात येत आहे, तो उद्देशच साध्य होणार नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढत जाऊन संपूर्ण लॉकडाउनला पुन्हा एकदा सामोरे जावे लागू शकते. 

पोलिस बंदोबस्त नावालाच 
टाळेबंदीमुळे बाजारपेठेत गर्दी होणार हे अपेक्षित असल्याने गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना करणे आवश्यक होते. गैरसमजातून नागरिकांनी सोमवारी, मंगळवारी बाजारपेठ, पेट्रोलपंप व किरणा दुकानांसह बँकांमध्ये गर्दी केली. ही गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. पोलिस बंदोबस्तही नावालाच दिसून आला. 

हे देखील वाचाच - भोकरच्या दिवशी प्रकरणात आरोपीस ५९ व्या दिवशी फाशीची शिक्षा- न्या. एम. एस. शेख यांचा निकाल
  
नागरिकांचा संयम सुटला 
जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी लॉकडाउनची घोषणा रविवारी केल्यानंतर सायंकाळपासूनच लॉकडाउनबाबत वेगवेगळ्या अफवा सुरू झाल्या. त्यातच मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी आठवडाभराची वेळ दिल्याने या अफवांमध्ये भरच पडली. परिणामी नागरिकांचा संयम सुटला व सोमवारी, मंगळवारी खरेदीसाठी घराबाहेर पडून बाजारात नागरिकांनी गर्दी केली.  

येथे क्लिक करा - सर्दी, खोकला, तापाने उडविली नागरिकांची झोप
  
दारुची अवैध साठेबाजी 
अकरा दिवस दारुची दुकाने, बार बंद राहणार असल्याने अवैध दारू साठेबाजीला उत आला. शहरातील सर्वच वाईन शाॅपवर साठेबाजांची गर्दी मंगळवारी दिसून आली. पोलिसांकडून शोध मोहीम राबविल्यास मोठा साठा जप्त होऊ शकतो. मात्र, थातुरमातुर कारवाई करून घेत पोलिस स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT