file photo 
नांदेड

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या काय आहेत मार्गदर्शक सूचना?

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यात कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने कोविड-१९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोविड-१९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील प्रमाणे विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस) ही खालील प्रतिबंधास अधिन राहून ५० टक्‍के क्षमतेच्‍या अधिन राहून सुरू राहतील. यात मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही . (No Mask - No Entry) सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. या आदेशाचा भंग केल्‍यास संबंधीत सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस ) ही कोवीड-१९  विषाणू  संसर्ग केंद्र सरकारने आपत्‍ती म्‍हणून अधिसूचीत केले असे तोपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्‍थापना मालक हे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. 

सर्व शाँपीग मॉल्स यांना खालील नमूद प्रतिबंधाचे पालन करणे बंधनकारक असेल. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही (No Mask - No Entry). सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवणेत यावीत. सर्व आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. सर्व मॉल्सचे व्यवस्थापक यांनी संबंधित मॉल्समध्ये असलेले थियटर्स व इतर कार्यरत आस्थापना यामध्येही घालणेत आलेल्या प्रतिबंधाचे सदर आस्थापना सुरू करणेपूर्वी तसेच सुरू असताना पालन करत आहेत याबाबत दक्षता घेणे. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात वाजता ते सायंकाळी पाच वाजता या कालावधीत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करून चालू राहतील, सदर निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित शॉपिग मॉल्स ही कोव्हीड-१९ विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील 

कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका,संमेलने तसेच यात्रा, उत्सव,उरुस इत्यादीचे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे, इतर ठिकाणे ही कोव्हीड-१९ विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.

यापुर्वीच्या आदेशानुसार लग्नसमारंभ व इतर समारंभ हे ता. १६ ते ता. ३१ मार्च या कालावधीत लॉन्‍स, मंगल कार्यालय, हॉल्‍स व अन्‍य तत्‍सम ठिकाणी लग्‍न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच कोवीड-१९ विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता संदर्भ क्र. सातनुसार जिल्‍ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्‍स, परमीट रूम, बेकरी, स्‍वीट मार्ट, चॉट भांडार, ढाबे इ. बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत.    

अंत्‍यविधी, अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त २० नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री करावी.   

गृह अलगीकरणास पुढील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल. गृह अलगिकरण झालेल्या नागरिक, रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोव्हीड- १९रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून १४ दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल, जेणेकरुन त्या ठिकाणी कोव्हीड-१९ रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल. कोव्हीड-१९ + Ve रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine)असा शिक्का मारणे. सदर कोव्हीड- १९ रुग्ण गृहअलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, याविषयी दक्षता घेण्यात यावी. गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड-१९ रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले जाईल.

सर्व कार्यालये / आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही ५० टक्के  क्षमतेच्या  अधिन राहून सुरू राहतील. घरातून काम (Work from home)  करणेबाबत प्रोत्साहित करणे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय/आस्थापना व्यवस्थापना ही कोव्हीड- १९ विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असेल तोपर्यत बंद राहतील. या ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे. मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही (No Mask- No Entry). सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवण्यात यावीत. सर्व आस्थापनांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल. सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मंदीर, मस्‍जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौध्‍दविहार व  इतर धार्मिक स्‍थळे व प्रार्थना स्‍थळे बाबत आदेश पारीत करण्‍यात आले आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्याबाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश ता. ३१ मार्चपर्यंत अस्तित्वात राहतील.

सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल, असे आदेश ता. १९ मार्च रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT