04.jpg 
नांदेड

शहर झाले चिडीचूप...

स्वप्निल गायकवाड

नांदेड : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकांनी करायची आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाब वगळता रस्त्यावर याल तर गय केली जाणार नसून दंडासह पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळणार, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिला होता. सोमवारी (ता.१३) शहरात जिल्हाधिकारी डॉ. विपिन व पोलिस अधीक्षक विजय कुमार मगर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.


नांदेड जिल्ह्यात रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी आदेश लागू झाला आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी आदेशाची अंमलबजावणीचे नियोजन केले जात होते. यासाठी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. घराबाहेर विनाकारण पडू नका, असे आदेशही दिले आहेत. अत्यंत अत्यावश्यक बाब असेल तरच बाहेर येण्यास मुभा असेल, त्याव्यतिरिक्त कुणालाही बाहेर पडता येणार नाही, असे यापूर्वी डॉ. ईटनकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी
या आदेशाच्या कडक अंमलबजावणीस सुरवात झाली असून शासकीय कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक वगळता सकाळी कुणी फारसे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले नाही. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन करत खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर हे रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरातील काही भागांत जाऊन पाहणी केली. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत चालकांना बाहेर येण्यामागचे कारण विचारले, यापुढे बाहरे न पडण्याचे डॉ. ईटनकर यंनी सांगितले.

पोलिसांची वेळोवेळी खबरदारी
सोमवारी सकाळपासूनच शहरातील नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत. शहरातील गजबजलेले रस्ते सकाळपासून ओस पडले होती. मुख्य मार्केट, बाजारपेठेतही सन्नाटा दिसून आला. पोलिस प्रशासनाच्या वतीने सकाळीच सायरन वाजत वाहने फिरवून नागरिकांना सावध करीत कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना करीत होते.

संपादन - स्वप्निल गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT