file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू- डॉ. विपीन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 12 डिसेंबर 2020 चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.  

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड : महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)-2020 ही परीक्षा रविवार 27 डिसेंबर  2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 21 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध 21 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी  8 ते सायं 4 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
          

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

SCROLL FOR NEXT