bb.jpg 
नांदेड

पहिल्याच पावसात शेतीची झाली दाणादाण

सकाळ वृत्तसेवा


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः मॉन्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडल्यामुळे ऐन पेरणीच्या काळात वेळेवर पाऊस पडणार की नाही, या चिंतेत शेतकरी होता. पण मान्सूनला सुरवात होताच शेतकऱ्यांवर कृपा दाखवत विजेच्या कडकडाटांत वादळी वाऱ्यासह तब्बल तीन तास मनसोक्त बरसला. या मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह माती खरडून जाऊन शेतीला नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

काही काळासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली
मुखेड तालुक्यातील बहुतांशी शेतीही पावसाच्याच पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे येथील शेतकरी हा मॉन्सून येण्यापूर्वीच आपल्या शेतीची सर्व प्रकारची मशागत करून पेरणीसाठी सज्ज होता. पण अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतात असलेल्या उभ्या पिकांसह माती व धुरे खरडून गेली असून त्या ठिकाणी नाला तयार झाला आहे. तर शेतीच्या सर्वच भागात पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणचे निदान दहा ते पंधरा दिवस तरी पाणी हटणार नसल्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. तर जनावरांसाठी शेतात ठेवलेला कडबा, गुळी व इतर चाराही या पावसात वाहून गेला. आहे तो थोडा चारा या पावसाच्या पाण्यामुळे कुजून जाण्याची शक्यता आहे. या मुसळधार पाऊस पडल्यामुळे देगलूर - उदगीर मार्गावर असलेले सर्वच लहान - मोठे पूल पाण्याखाली बुडाल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून काही काळासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती.

या वेळी मुक्रमाबाद, रावणकोळ, हाळणी, चिंचगाव, दापका(गुं), कलंबर, बामणी, गोजेगाव, खतगाव, हंगरगा, बेन्नाळ, सावळी, सावरमाळ, वंटगीर, लखमापूर, गोजेगाव, भासवाडी, माराजवाडी, हासनाळ, भाटापूर, कोळनूर, गोणेगाव, बिहारीपूर, वळंकी, रावी, खतगाव, देगाव, डोरनाळी, यासह अनेक गावांत या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर या मुसळधार पावसामुळे शेतातील माती खरडून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करून त्यांना त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवून तत्काळ मदत करावी. शासनाची मदत ही, अशा काळात शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे विलंब न करता पंचनामे करून तत्काळ मदत पुरवावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असे शिवशंकर पाटील कलंबरकर, रयत क्रांती युवा जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT