fulwal.jpg 
नांदेड

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोक्याची घंटा

सकाळ वृत्तसेवा

फुलवळ, (ता.कंधार, जि. नांदेड) ः येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे ‘सकाळ’ने बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने उर्वरित कामाला सुरवात झाली खरी, परंतु कामाची गती संथगतीने चालू असल्याने पाऊस पडताच रस्ता चिखलमय होत असून त्यावरून वाहने चालवणे कसरतीचे बनले आहे. खड्डेमय व चिखलमय रस्त्यावरून वाहतूक करताना नेहमीच छोटे - मोठे अपघात होत असल्याने सदर राष्ट्रीय महामार्ग सध्यातरी धोक्याची घंटा ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाची गती वाढवून लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अन्यथा येणाऱ्या काळात अपघातांची शृंखलाच पाहायला मिळेल, अशी भीतीदायक चिंता व्यक्त केली जात आहे.

यामुळे याचसंदर्भात ‘सकाळ’ने शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी (ता.तीन) जून रोजीच्या अंकात सविस्तर बातमी प्रकाशीत केली होती. त्याच बातमीची तत्काळ शासन व प्रशासनाने दखल घेतली आणि लागलीच (ता. तीन) जून रोजीच फुलवळ बसस्थानकाजवळ दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यावर कोरडी गिट्टी टाकून सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरवात केली. यामुळे गावकरी व प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करत ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले होते. परंतु, पुन्हा मागे तसे पुढे सदर काम ठप्प झाल्याने आणि आता एक साईडच रस्ता असल्याने आणखीनच वाहनांना अडचण झाली असून समोरासमोर आलेल्या वाहनांना साईड देणेही अवघड होऊन बसले आहे.


दुर्दशा पाहवेनाशी झाली
नांदेड ते उस्माननगर, फुलवळ मार्गे उदगीर जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० आणि लोहा ते घोडज, फुलवळ मार्गे मुखेड जाणारा राज्य महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांचे काम गेली एक वर्षांपासून चालू आहे. सदर दोन्ही रस्त्याचे काम खूपच संथ गतीने सुरू असल्याने आणि ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने, तर काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा पाहवेनाशी झाली आहे.

रस्त्याच्या कामाची गती वाढवावी
जागोजागी अपघातसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर बहुतांश ठिकाणी खड्डेमय रस्ता झाल्याने दुचाकीबरोबरच चार चाकी वाहनचालकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर फुलवळ येथे या दोन्ही रस्त्यांचा संगम होत असल्याने येथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यातच येथील बसस्थानक जवळ रस्ता खोदून ठेवल्याने अपघातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा सध्या होत असलेले आणि भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे तत्काळ बुजविणे आणि अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी प्रवाशी व वाहनधारकांतून मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT