NND19KJP01.jpg 
नांदेड

ऑनलाइन पिककर्ज मागणी अर्जासाठी मुदतवाढ

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन मागणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ही सुविधा आता ता. ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी सांगितले.

ऑनलाईन पीक कर्ज मागणी करण्याची सुविधा
जागतिक महामारी covid-19 विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे बँकेतील गर्दी मुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी २०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पीक कर्ज मागणी करण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. 

दोन लाख ४५ हजार ५३० शेतकऱ्यांनी केले अर्ज
सुरुवातीला ता. १७ मे ते ता. २७ मे दरम्यान शेतकऱ्यांना पीक करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता आले. यानंतर मुदत वाढवून ता. सहा जूनपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील दोन लाख ४५ हजार ५३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदणी केली आहे. या पीक कर्ज मागणी नोंदणीच्या याद्या जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व्यवस्थापकामार्फत संबंधित बँकेत पाठविण्यात आले आहेत. 

३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ 
आगामी खरीप पीक कर्ज हंगामात जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये. म्हणून पिक कर्ज मागणी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अनुषंगाने पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी ता. ३० जून पर्यंत संबंधित संकेतस्थळावर जाऊन पीक कर्जाची मागणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

‘आरटीओ’त अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु
प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु करण्यात आले असून अर्जदारांनी अटींचे पालन करावे. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. मास्क व हँडग्लोज घालून कार्यालयात प्रवेश करावा. आगाऊ वेळ निर्धारण (अपॉईन्टमेंट) असणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असे नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी कळविले आहे.

प्रत्येक कामांसाठी कोटा निश्चित
राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांतर्गत असणाऱ्या शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरीत सर्व कामे जसे अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे इ. कामकाज सुरु करावीत, असे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त यांनी नुकतेच दिले आहे. त्यानुसार या कामांसाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरु करण्यात येऊन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामांसाठी कोटा निश्चित करुन देण्यात येणार आहे.

गर्दीबाबत निर्देशांचे पालन करणे 
ज्या अर्जदारांनी लॉकडाऊन कालावधीत शिकाऊ, पक्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी वेळ घेतली आहे  त्यांनी आपली अपॉईन्टमेंट रीशेड्यूल करुन घ्यावी. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयात गर्दी कमी ठेवण्याबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील असे, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Ricky AJ Syngkon Passed Away : ज्येष्ठ खासदार फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन; राज्यावर शोककळा

Mukesh Ambani AI Vision : 'एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट वाढणार; रिलायन्स गुंतविणार 10 लाख कोटी', मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

Hingoli Accident: बारावीचा पेपर देऊन परतणारे दोन विद्यार्थी अपघातात ठार

Pune News : विवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही; न्यायालयाने लग्न ठरवले रद्द

Kolhapur Dairy Farmers Milk Rate : गोकुळ दूध संघाची दरवाढ; म्हैस दूध खरेदीत १, विक्रीत २ रुपयांची वाढ, नविद मुश्रीफ निर्णय

SCROLL FOR NEXT