नांदेड : जिल्ह्यातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही तीरावरील मोटारींचा विद्युत पुरवठा शनिवारपर्यंत (ता. ३०) नियंत्रीत करण्यात आला असून जलाशयाच्या दोन्ही तीरावरील बागायतदारांनी बंद कालावधीत मोटारी बंद ठेवू जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाच्या (उत्तर) कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
विद्युत पुरवठा नियंत्रना संदर्भात बैठक
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा नियंत्रित करण्यासंदर्भात आढावा बैठक बुधवारी (ता. १३) घेण्यात आली होती. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणी वापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार शनिवारपर्यंत (ता. ३०) या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरु राहील. परंतू जलाशयावरील पंपासाठीचा थ्री फेज विद्युत पुरवठा तसेच विहीर व खाजगी बोअरचा विद्युत पुरवठा एक दिवस आड सुरु ठेवण्यात येईल.
हेही वाचा....ई शक्तीतंर्गत बचतगटांना खेळते भांडवल पुरवठा करा
अन्यथा मोटारी जप्तीचा आदेश
या नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करुन पाण्याचा नाश, अपव्यय टाळावा. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास व अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन प्रसंगी विद्युत मोटार जप्त करण्यात येईल, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
हेही वाचलेच पाहिजे.....संभाव्य आपत्तीच्या काळात सतर्कता बाळगावी
सात ठिकाणी कापूस खरेदी सुरु
नांदेड : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्यावतीने दोन तर सीसीआयकडून पाच अशा सात ठिकाणी कापूस खरेदी सुरु असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.
जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी नोव्हेंबर महिन्यात सुरु झाली. तसेच पणन महासंघाचीही खरेदी त्याच सुमारास झाली. दरम्यानच्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे खरेदीला ब्रेक लागला होता. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शेतीमाल खरेदी सुरु झाली. जिल्ह्यात केंद्रीय कॉटन निगमकडून पाच ठिकाणी कापूस खरेदी सुरु आहे. यात किनवट, नायगाव, कुंटूर, अर्धापूर व धर्माबाद या केंद्राचा समावेश आहे. तर कापूस पणन महासंघाकडून भोकर तसेच तामसा या ठिकाणी कापूस खरेदी करण्यात येत असल्याचे पणनच्या सुत्रांनी सांगीतले.
पणनकडून दिड लाख क्विंटल खरेदी
पणनकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या दोन खरेदी केंद्रावर एक लाख ४१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यात तामसा येथील खेरदी केंद्रावर ४४ हजार ७२५ क्विंटल तर भोकर येथील खेरदी केंद्रावर ९७ हजार १७५ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती पणनकडून मिळाली. सध्या दोन्ही केंद्रावर कापसाची खरेदी सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.