file photo 
नांदेड

नांदेड शहराचे विद्रुपीकरण खपवून घेतल्या जाणार नाही- निलेश मोरे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्वच्छ व सुंदर नांदेड शहराला मागील काही दिवसांपासून होर्डींग्जवाल्यांनी गालबोट लावले आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी होर्डींग्ज न लावता वाटेल तिथे आपल्या मर्जीनुसार शहरात होर्डींग्ज लावल्या जात आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. येणाऱ्या सण - उत्सव व राजकिय नेत्यांच्या वाढदिवसांचे होर्डींग्ज लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीतावर कडक कायदेशईर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिला. 

आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शहरातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची रविवारी (ता. सात) बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी उपस्थित सर्वांना महापालिकेची परवानगी घेऊनच शहरात फलक लावावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जनतेने न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे

शहराचे विद्रुपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सण- उत्सव साजरे करताना जनतेने न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे या काळात पूर्वपरवानगीने फलक लावावेत महापालिकेने फलक लावण्यात संदर्भात काही जागा निश्चित केले आहे त्याच ठिकाणी ते फलक लावावे इतरत्र फलक लावून शहर विद्रुपीकरण करु नये. फलकामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व सण- उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती बैठकिला उपस्थिती

या बैठकीला प्रभारी पोलिस उपाधीक्षक (शहर) विक्रांत गायकवाड, वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, विमानतळ ठाण्याचे अनिरुद्ध काकडे, महापालिकेचे अजितपालसिंग संधू यांच्यासह आधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT