deglur biloli bjp congress assembly lok sabha election politics
deglur biloli bjp congress assembly lok sabha election politics  sakal
नांदेड

Nanded News : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात शहकाटशहाच्या राजकारणात कोण पडणार कोणास भारी...

विठ्ठल चंदनकर

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बालेकिल्ल्यात आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून बेरजेचे राजकारण होत असले तरी शहकाटशहाच्या राजकारणात कोण कोणास धोबीपछाड करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व बिलोली तालुक्यातील भाजपचे नेते जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा वर्ग मोठा असला तरीही त्यांच्या भाजपात जाण्याने पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्या. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना निवडून आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केल्याने दादांचे राजकीय वजन घटल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा आता विरोधी पक्ष कसा घेतात यावर भविष्यात दिशा ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे दर्शन घडविले असले तरी खतगावकरांच्या एकाधिकारशाही पुढे ही महायुती टिकेल की तुटेल याबद्दल आता शंका निर्माण होत आहे.

दोन्ही बाजार समितीत उद्धव ठाकरे गटाला चार जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना उपसभापती पद न दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे संचालक व पदाधिकारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. याचा फायदा तालुक्यातील भाजप व मित्रपक्ष भविष्यात निश्चितपणे घेऊ शकतील अशीही चर्चा होत आहे.

या निवडणुकीच्या विजयामध्ये खतगावकरांचा सिंहाचा वाटा असला तरी आमदार जितेश अंतापुरकर, माजी शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,

माजी उपसभापती शंकर यंकम यांच्यासह अशोक चव्हाण यांना मानणारा गटाचा मोलाचा वाटा आहे. बिलोलीतील उपसभापती पदाची निवड करताना मात्र खतगावकर विरुद्ध काँग्रेस मधील इतर तरुण हे चित्र पाहायला मिळाले याचा फायदा निश्चितच भविष्यात विरोधी पक्षनेते घेऊ शकतात.

‘बीआरएस’चा केविलवाणा प्रयत्न

तालुक्यात काँग्रेस व भाजप हे प्रतिस्पर्धी दोन पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे व ठाकरे गटाचा प्रभाव तालुक्यात नाही. शेजारच्या तेलंगणा राज्यातील ‘बीआरएस’ पक्षाने सीमावर्ती भागात आपला विस्तार वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी त्याचा फारसा प्रभाव या भागात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT