देगलूर पोटनिवडणुकीची आज मतमोजणी sakal
नांदेड

देगलूर पोटनिवडणुकीची आज मतमोजणी

पंधरा टेबलावर ३० फेरीत होणार मतमोजणी ; दुपारनंतर लागणार निकालाचा कानोसा

सकाळ वृत्तसेवा

देगलूर : देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी शनिवारी (ता.३०) रोजी २०० गावातील ४१२ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी (ता.दोन) रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुरुष मतदार १ लाख ५४ हजार ९२ तर स्त्री मतदार १ लाख ४४ हजार २५६ व इतर ५ अशी एकूण मतदारांची संख्या २ लाख ९८ हजार ३५३ एवढी होती. यापैकी (ता.३०) रोजी प्रत्यक्षात १ लाख ९० हजार ८०० एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष १ लाख ७६८ मतदार तर स्त्री ९० हजार ३१ मतदारांसह, कुडंलवाडीमध्ये एका तृतीयपंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी ही ६३.९५ टक्के एवढी झाली.

उमेदवार व प्रतिनिधींना कक्षात प्रवेश

मतमोजणीसाठी १५ टेबल ठेवण्यात आले असून यामध्ये एका टेबलवर टपालाद्वारे करण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बारा उमेदवारांना व १५ प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश आहे. स्वतः उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र जवळ बाळगणेही गरजेची आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त :

मतमोजणीसाठी जवळपास ७७ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एक निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहायक निवडणूक अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होणार असून, मतमोजणीनंतर सुरक्षा कक्षात ईव्हीएम मशीन सील करून ठेवण्यासाठी बिलोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, अनिल परळीकर, संदीप भुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना १३ सहायक कर्मचारी व ९ चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोबत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय रिजर्व पोलिस, राज्य राखीव दल, पोलिस दल, पोलिस समादेशक, महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणी ठिकाणी व शहरात कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

‘वंचित’च्या मताधिक्यावर काँग्रेस-भाजपचे दावे-प्रतिदावे :

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात दोन राष्ट्रीय पक्षातच अर्थात काँग्रेस व भाजप पर्यायाने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोघांच्या राजकिय युक्त्या व क्लुप्त्या यावरच पोटनिवडणुकीचा सामना रंगला होता. म्हणूनच वंचितच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते यावरच त्यांच्या यश अपयशाचे दावे काँग्रेस व भाजप समर्थकांकडून केले जात आहेत.

मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर :

येथील पंचायत समितीच्या वरच्या माळ्यावरील सभागृहात होणाऱ्या मतमोजणी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून इमारतीच्या चहूबाजूंनी सीसीटीव्हीची नजर राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मीडिया कक्ष पंचायत समितीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयात करण्यात आला होता, पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अगदी गेटवर असलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयात मीडिया कक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Dhule Municipal Election : धुळ्यात राजकीय वातावरण तापले; चार पालिकांमध्ये ९५ जागांसाठी चुरशीची लढत, २ डिसेंबरला मतदान

Yeola News : अनुदानात अडथळा! येवल्यातील १४ हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास अडचणी; ई-केवायसी तत्काळ करा.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

SCROLL FOR NEXT