file photo 
नांदेड

भाजपमुळे लोकशाही व देश धोक्यात- डाॅ प्रा. यशपाल भिंगे 

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : देशातील स्वायत्त संस्था, लोकशाही व देश भाजपमुळे धोक्यात आला आहे. देशात जाती धर्मात भांडणं लावून सत्ता प्राप्त करण्याचा खेळ सुरु आहे. देशातील शेतकरी तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी रस्त्यावर येऊन शंभर दिवस झाले तरी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करित नाही ही गंभीर बाब आहे. तरुणांनी धर्मनिरपेक्ष विचार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन देश मजबूत करावा असे आवाहन राष्ट्रवादी काॅग्रेसचे डाॅ यशपाल भिंगे यांनी अर्धापूर येथे शुक्रवारी (ता. १२) केले.

शहरातील जम- जम मंगल कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील बारसगाव, येळेगाव आदी गावातील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी आत्माराम कपाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एका छोट्याखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी आनंद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील क्षिरसागर, चंद्रकांत टेकाळे, शेख साबेर,संदीप राऊत आदी उपस्थित होते.

आत्माराम कपाटे यांनी आपल्या पक्ष प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, भाजपने भुरळ पाडल्याने पक्ष सोडून भाजपत प्रवेश केला होता.पण गेल्या दोन वर्षात भ्रमनिरास झाल्याने पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असे कपाटे यांनी सांगितले. तर आनंद पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काॅग्रेसने जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत घेतले तर सोबत जाऊ नाही तर स्वतंत्र निवडणूका लढवून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. यावेळी शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काॅग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शशिकांत पाटील क्षिरसागर यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT