file photo 
नांदेड

नांदेडच्या या हॉस्पिटलमधील डायलिसीस विभाग बंद होणार- रुग्णांचा जीव टांगणीला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गेल्या वर्षांपासून येथील पूर्णा रोडवरील छत्रपती चौकातील श्री गुरुजी हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत गरीबांसाठी सुरळीत सुरू करण्यात आलेल्या डायलिसीस विभागाला मॅनेजमेंटने परवडत नाही म्हणून हा विभाग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे या हॉस्पिटलचे व्यवस्थापक अरुण रेणके यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात किडनी आजाराने त्रस्त असणा-या अतिसंवेदनशिल आजाराबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय रुग्णांच्या मुळावर उठला आहे. या बाबत किडनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी बुधवारी (ता. २२) जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना निवेदन देऊन डायलिसीस विभाग बंद न करता पुर्ववत चालूच ठेवावा व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती केली आहे.

गेल्या वर्षी श्री गुरुजी रूग्णालयात डायलिसीस विभागाची सुरुवात करण्यात आली. हा विभाग शासनाच्या म. फुले आरोग्य विभागाअंतर्गत सुरु करण्यात आला. चांगली सुविधा मिळत असल्याने योजनाधारक गरीब रुग्ण या योजनेचा फायदा घेत डायलिसीसचा लाभ घेत होते. यासाठी नांदेड शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील रुग्ण येथे येत होते. सध्या कोरोनाचा काळ सुरु असल्याने व डायलिसीस रुग्न हा अतिसंवेदनशिल वर्गात येत असल्याने हा विभाग बंद करु नये यासाठी काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व्यवस्थापक अरुण रेणके यांची भेट घेवून पोटतिडकिने आपली व्यृथा मांडली. मात्र व्यवस्थापनाने महिन्यापुर्वीच हा विभाग बंद करण्याचा निर्णय झालाय व योजनाही बंद करण्याबाबत शासनाला कळविले असून योजना बंद करण्याबाबतची मान्यताही आल्याची यावेळी माहिती दिली.

डायलिसीस रुग्ण मानसिक तणावासह आर्थिक संकटात

हॉस्पिटलच्या या निर्णयामुळे डायलिसीस रुग्ण मानसिक तणावासह आर्थिक संकटात सापडले आहेत. एका रुग्णाला सरासरी आठवड्यातून दोनदा डायलिसीस करावे लागते. एक वेळेचेही डायलिसीस हुकले तर रुग्णाच्या जिवावर बेतु शकते. ही बाब गंभीर असल्याने शेकडो रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

हा प्रकार म्हणजे खोकला आला तर गळा कापणे

डायलिसीस विभाग बंद करताना दुसरीकडे रुग्ण समायोजित करण्याचा व्यवस्थापनाचा मनसुबा असला तरी खोकला आला म्हणून गळा कापण्यासारखा हा प्रकार असल्याची तिव्र प्रतिक्रिया रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT