file photo 
नांदेड

दिशादर्शक आणि बळ देणारी स्टोरी : इवल्याश्या हाताचा जगण्यासाठी संघर्ष; काळ्या बिब्याच्या विक्रीतून पांढरी कमाई

विठ्ठल चिवडे

कुरुळा ( जिल्हा कंधार ) : जगण्याची भ्रांत आणि कोरोनामुळे आलेली संक्रांत यामुळे ग्रामीण भागात प्रपंचासाठी संघर्ष आणखीनच तीव्र झाला. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत पोटाची खळगी भरण्यासाठी माता- पित्याच्या जन्मजात संघर्षाला साथ देण्यासाठी इवलेशे हातही पुढे सरसावतात. कुटुंबाला आर्थिक आधार व्हावा, एकीकडे शिक्षणाची तर दुसरीकडे जगण्याची भ्रांत यासाठी हात काळे करत काळ्या बिब्याच्या विक्रीतून पांढरी कमाई करणाऱ्या इवल्याश्या हाताचा हा संघर्ष किती मोठा असेल याची जाणीव ग्रामीण भागातील हे बोलके चित्र पाहताक्षणीच होते.

कुरुळा येथील तुळशीराम गंगाधर चोपवाड हा इयत्ता आठवी शिकलेला विद्यार्थी. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची. तुळशीरामला त्याच्यापेक्षा लहान इतर चार भावंडे. त्यात तीन दिव्यांग आहेत. पैकी दोन लहान अंध दिव्यांग बहिणी आणि दोन्ही पायांनी व्यंगत्व आलेला भाऊ. यामुळे त्याच्या आईचा पूर्णवेळ त्या भावंडांचा सांभाळ करण्यातच जातो. वडील गंगाधर दिवसभर मिळेल तो रोजगार करुन आर्थिक जुळवाजुळव करतात आणि संसाराचा गाडा कसाबसा पुढे हाकतात. अशा हलाकीच्या परिस्थितीतही गंगाधर यांनी तुळशीरामच्या शिक्षणाची परवड केली नाही.परंतु कोरोनाने पोटावरच लादलेली टाळेबंदी यामुळे भाकरीची भ्रांत निर्माण झाली.

शाळेच्या वाटा स्तब्ध झाल्या आणि तुळशीराम आपल्या कुटुंबाला होईल ती मदत करु लागला. कुरुळ्यात बऱ्यापैकी भोई समाजाची बिब्बे फोडणारी घरे असल्याने त्याला रोजगाराचा मार्ग दिसला आणि त्याने रोज रानात फिरुन बिबे गोळा करुन कुटुंबाला आर्थिक दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. हिवाळ्यातील चवीला गोड असणारा फुलबिबा सुका रानमेवा आणि त्याच्या खालचा भाग काळा बिबा असे दिवसभरात दीडशे ते दोनशे रुपयांची बिबे आपण गोळा करत असल्याचे तुळशीराम सांगतो. घरी खाणारी तोंड जास्त आणि कमावणारी व्यक्ती एकमेव त्याचे वडील असल्याने काहीतरी करुन आपणही त्यांना आधार द्यावा यासाठी आपण शिक्षणाबरोबरच कुटुंबाला जमेल त्या पद्धतीने आर्थिक मदत करण्याचा मानस तुळशीरामच्या कृतीतून दिसतोय.
तुळशीरामच्या इवल्याश्या हाताची ही कृती विदारक असली तरी कामच काही नाही म्हणणाऱ्यांना दिशादर्शक आणि बळ देणारी आहे हे नक्की. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT