korona logo.jpg 
नांदेड

होमिओपॅथिक औषधी मोफत वितरण करा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावात मोफत आर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून मोफत औषधी वाटप कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून औषधीला परवाणगी
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रत्येक राज्याला आर्सेनिक अल्बम ३० हे औषध वापरण्याचे दिले आदेश. अनेक राज्यात, अनेक जिल्ह्यात मोफत वाटले जात आहे.  ‘आर्सेनिक अल्बम ३०’ कोणतेही घातक परिणाम नसल्याने सर्वांसाठी उपयुक्त आहे. करोनासाठी ही औषधी वरदान असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना कोरोना नाही अशा, व्यक्तिसाठीच हे औषध असल्याने हे औषध रामबाण उपाय असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी वापर
नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस द्यायला सुरवात केली आहे. याचा लाभ सर्वसामान्य बरोबरच जेष्ठ नागरिक आणि कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्यांना अधिक होणार आहे. सध्या पालिकेच्या अनेक विभागात याची सुरवात झाली आहे. कोरोना रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरला असल्याने मुंबई महानगर पालिकेचा पॅटर्न संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राबविन्यात यावा.

दुष्परिणाम नाही
आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक गोळी, औषध करोना पॉझिटिव्ह रुग्णांना घेता येणार नाही. कोरोना नसलेल्यांनाच ही गोळी घेता येणार आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) नसल्याने या गोळ्या लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तिही घेवु शकतात. लहान मुले व जेष्ठ नागरिक यांनी मात्र वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांचा सल्ला घेवुनच हे औषध वापरावे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने याची सर्व राज्यांना शिफारस केली आहे. रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सर्वसामान्यांसह आरोग्य सेविकांनाही या गोळ्या देण्यात येत आहेत.


जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी मदत
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने संपूर्ण जिल्हा जलद गतीने कोरोना मुक्त करण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी व व्यापक उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वांना घरा घरात फ्री मध्ये आर्सेनिक अल्बम ३० च्या डोसचे, औषधांचे त्वरित वितरण करण्यात यावे. जेणे करून करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल असे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील व दक्षिण विभागप्रमूख प्रशांत बारादे यांनी मागणी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT