Nanded News 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी विवरणपत्राचे वाटप 

प्रमोद चौधरी

नांदेड : २०१९-२० वर्षाच्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या सहा हजार ९०० शिक्षक खातेदारांच्या अद्यावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना शनिवारी (ता.१९) वाटप करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी आर.टी. कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे, डी.यू. इंगोले, व्‍ही.आर. पाटील, उप मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शेखर कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदी उपस्थित होते. 

या विवरण पत्रांमध्ये, ज्या महिन्यांमध्ये वर्गणी दर्शवण्यात आली नसेल, अशा महिन्याची जीपीएफची शेड्युलची कपात प्रत वित्त विभागात सादर केल्यास सुधारित प्रत तात्काळ निर्गमित केली जाईल. संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांच्‍या अधिनस्त सर्व शाळेतील शिक्षकांना या भविष्य निर्वाह निधीच्या स्लीप वितरित कराव्यात व उलट टपाली त्याची पोच विभागात सादर करावी असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. तालुक्याकडून नियमितपणे दर महा शेड्युल प्राप्त झाली तर हे काम कमी वेळात होऊ शकेल असेही त्‍या म्‍हणाल्‍या. या विवरणपत्राव्‍दारे भविष्‍य निर्वाह निधीमध्‍ये असणारी रक्‍कम त्‍यांना समजणार आहे. 

तालुकानिहाय भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्र 
२०१९-२० या वर्षाच्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या शिक्षक खातेदारांच्या अद्यावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे देण्‍यात आली.

अर्धापूर ३४९
धर्माबाद १९०
माहूर १८२
हिमायतनगर १९३
मुदखेड- ३७०
कंधार- ६१७
बिलोली २९१
हदगाव ६१७
देगलूर ४६०
नायगाव ४१७
भोकर ३९३
लोहा ७०७
उमरी २७९
मुखेड ६८४
नांदेड ६२०
इतर ५३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT