file photo 
नांदेड

जिल्हा सहकारी बॅंकेची रनधुमाळी, कार्यक्रम जाहीर, अर्धापूर तालुक्यातून एक सदस्य निवडून जाणार.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यातील एक हजाराच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकेचा धुरळा खाली बसत असतांनाच आता वाढणा-या तापमानासोबत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील राजकारण तापणार आहे. या सहकारी बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अर्धापूर तालुक्यातील उत्सुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. तालुक्यातून एक संचालक निवडून दिला जाणार असून. 23 मतदारांची संख्या आहे. 

गेल्या निवडणुकीत काॅग्रेस विरुद्ध महाआघाडी झाली होती. या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. गेल्या पाच वर्षाच्या काळत ब-यांच राजकीय घडामोडीं झाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग सुरु आहे. तसाच प्रयोग बॅंकेच्या निवडणूकीत होवू शकतो. तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सोळा तालुक्यात असून सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यातून एक सदस्य निवडूण देण्यात येतो. अर्धापूर तालुक्यातून गेल्या निवडणुकीत केशवराव पाटील इंगोले मालेगावकर हे निवडून आले होते. त्यांनी बॅंकेच्या चुकीच्या कारभारवर बोट ठेवून कारभार सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच बॅंकेच्या हितासाठी प्रयत्न केले.

अर्धापूर तालुक्यात सोसायटी मतदार संघात 23 मतदार आहेत. यात भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख, माजी उपसभापती डाॅ लक्ष्मण इंगोले , माजी सभापती बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर ही प्रमुख मतदार व भावी उमेदवार आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात हा तालुका आसल्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. बॅंकेची परिस्थिती पाहतात फारसे उमेदवार उत्सुक नसले तरी निवडणूक आली की लोकप्रतिनिधींच्या अंगात वारे शिरत असते. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच होवू शकतो. शिवाय लक्ष्मी दर्शनसाठी मतदार वाट पाहून आहेत. ही निवडणूक प्रक्रिया पुढील महिन्यात पार पडणार असून अधिकृत घोषणा गुरुवारी (ता. 25) करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्षाला फक्त ४ अनुदानित सिलिंडर? उज्ज्वला योजनेच्या नियमात केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत; काय होणार परिणाम?

IND vs AFG : विराट कोहलीची माघार, आता रोहित शर्माबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स, चाहत्यांना...

Talegaon MIDC Accident: तळेगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपनीत फायर एक्सटिंग्विशर सिलींडर फुटून कार्बन डायऑक्साईड गळती; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

"महागडे स्किनकेअर नाही..." तर तुपासोबत खाते हा पदार्थ; आलिया भट्टने स्वतःच सांगितलं चमकदार त्वचेचं रहस्य

SCROLL FOR NEXT