file photo 
नांदेड

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा दणका : एका खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल; अनेकांचे धाबे दणाणले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आरटीपीसीआर तपासणी दरम्यान शासनाने ठरवुन दिलेल्या तपासणी दरापेक्षा अतिरिक्त रक्कम वसुल करणाऱ्या एका रुग्णालयाच्या जिल्हाधिकारी यांनी मुसक्या आवळल्या. डाॅक्टरलेन परिसरात असलेल्या एका लॅबवर हा गुन्हा दाखल होताच रुग्णांकडून कोरोनाच्या नावाखाली अतिरिक्त तपासणी दर वसुल करणाऱ्या रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे. वजिराबाद पोलिस या प्रकरणाची अधिक तपासणी करत आहेत. 

येथील एका खासगी रुग्णालयात (लॅब) शासनाने नेमून दिलेल्या तपासणी दरापेक्षा अतिरिक्त दर वसूल करणाऱ्या एका रुग्णालयावर जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या आदेशावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. सुरेश सिंह बिसेन आणि त्यांचे सहकारी यांचे एक पथक डॉक्टर लेन येथे पोहोचले.

रुग्ण तपासणीदरम्यान समोर आलेल्या अभिलेखानुसार सरकारने आटीपीसीआर तपासणी दर सहाशे रुपये निश्चित केला असताना रुग्णांकडून दोन हजार रुपये घेत होते. याबाबत डॉ. सुरेशसिंह बिसेन यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रुग्णांकडून एकूण सोळा हजार रुपये आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी घेतलेले आहेत. सरकारने निश्चित केलेल्या तपासणी दरापेक्षा अकरा हजार दोनशे रुपये जास्त घेतले आहेत हे सिध्द झाले. वजिराबाद पोलिसांनी याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तीन मार्चच्या पहाटे एकच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे. शशिकांत चंद्रकांत शेळके आणि आनंद राजाभाऊ बोकन अशी गुन्हा दाखल झालेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. पन्हाळकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT