file photo 
नांदेड

खळबळजनक घटना : नांदेड जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण; सर्वांची प्रकृती स्थिर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात व शहरात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा संसर्ग सर्व गटातील नागरिकांना होत आहे. दररोज एक हजारहून अधिक रुग्ण संख्या वाढत असल्याने गुरुवार (ता. २५) पासून जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊन जाहीर केले आहे. याच काळात जिल्हा कारागृहातील जवळपास 22 जणांना कोरोनाने घेरले असून ते सध्या कारागृहातच गृहविलगीकरणमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनासह सर्वसामान्य नांदेडकरही हैराण झाले आहेत. कोरोना बाधीतांचा व मृतकांचा आकडा लक्षात घेता नांदेडकरांना चिंतेत टाकणारा हा विषय बनला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना लाॅकडाऊनच्या अंमलबजावनीसाठी सक्त सूचना दिल्या. शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना तपासणी केंद्र व लसीकरण केंद्र सुरु केले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नांदेड शहरात असलेल्या जिल्हा कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी याच कारागृहात 82 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या कारागृहात सध्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या बॅरेकचे काम सुरु असून अनेक कैदी हे दुसऱ्या जिल्ह्यातील कारागृहात पाठवण्यात आले आहेत. तरीसुद्धा नांदेडच्या कारागृहात दोनशेहून अधिक कैदी असल्याने त्यातील 22 जणांना कोरणाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून ते कारागृहात गृहविलगीकरणामध्ये सध्या उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक देखरेख करत असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT