diwali festival 2023 faral inflation edible oil expensive food market marathi news Sakal
नांदेड

Diwali Festival 2023 : दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी

सोयाबीन तेलाच्या दरात वाढ; शेंगदाणा, राइस ब्रॅण्ड तेल स्थिर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दिवाळी आठ दिवसांवर आली असताना खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी सात रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतरही दरवाढ झाली आहे. सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसत आहे.

ऐन दिवाळीत एकीकडे सोयाबीन तेलाची मागणी प्रचंड वाढली असून भावात वाढ झाल्याचे दिसत आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रॅंड तेलाचे दर मात्र स्थिरावलेले आहेत. सोयाबीन तेल महागल्याने गरिबांसह सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदा सोयाबीन पिकाला पावसामुळे फटका बसल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीनपासून तयार होणारी उत्पादने महागली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या तेलाची मागणी वाढल्याने सोयाबीनसह पामतेलाची आयात करावी लागत आहे. प्रामुख्याने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेल दर तब्बल सात रुपयांनी (प्रतिक्विंटल) कमी होते. सप्टेंबर अखेरीस सोयाबीनची स्थिती चांगली होती. त्यामुळे या तेलाच्या किंमतीही ११५ ते १२२ रुपये किलोवर स्थिर होत्या.

मात्र, सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत. आता सोयाबीन तेल प्रति किलो १२२ ते १३० रुपयांवर गेले आहे. दिवाळीत तेलाचा विविध पदार्थांसाठी अधिक वापर होतो. खाद्यतेलामध्ये सोयाबीनशिवाय, शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रॅंड आदी विविध कंपन्याचे तेल बाजारात आहे. मात्र, या तेलांचे भाव स्थिरावलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT