file photo 
नांदेड

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला या भ्रमात राहू नका- अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  संबंध जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोनाचा प्रादूर्भाव मागील एक महिण्यापासून जरा कमी झाला. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सध्या घट झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला या भ्रमात नागरिकांनी राहू नये असा इशारा कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिला आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे माहे मार्चपासून लॅाकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाजारपेठ उघडण्यास मुभा देण्यात आली. वाहतूक सेवाही सुरु झाली. प्रारंभी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर मृत्यूची संख्या वाढली होती. सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला या भ्रमात नागरिकांनी राहू नये. 

युरोप सारख्या देशात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. या देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु झाल्याची भीती निर्माण झाली असून भारतातही दिल्ली सारख्या शहरात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. त्याचा फटका इतर भारतातील राज्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी उपाययोजना म्हणून डॉक्टर मंडळी उपचारासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्क बांधा, नियमित सॅनिटायझरचा वापर करा 

कोरोनाच्या संसर्गाचा अद्याप संपला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी गर्दी न करता तोंडाला मास्क बांधावा आणि सॅनिटायजरचा नियमित वापर करावा असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले असून आपला व परिवाराचा बचाव करण्यासाठी काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT