नांदेड : कोरोना विषाणूच्या धास्तीने राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र ग्रामीण भागात भागातील विद्यार्थ्यांची स्मार्टफोन, संगणक व इतर आधुनिक साधनाच्या अभावी पिछेहाट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक हे शेती, मोलमजूरी करीत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. पाल्यासाठी स्मार्टफोन खरेदी करायचा म्हणजे उसनवारी किंवा कर्ज काढण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यायचे म्हणजे स्मार्टफोन हवा नाहीतर शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील तीस टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे. त्यासोबत ग्रामीण भागात इंटरनेट स्पीड सुध्दा कमी असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेतांना कमालीची त्रास सहन करावा लागतो. कधी कधी इंटरनेटचा स्पीड कमी असल्यामुळे अनेकवेळा ऑनलाईन तासिकेला सुध्दा विद्यार्थ्यांना मुकावे लागत असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
हेही वाचा - मुस्लिम समजालाही हवे शिक्षण व नोकरीत आरक्षण
ऑनलाईन शिक्षण पालकांसाठी डोकेदुखी
विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट देत असताना वेबसाईटवर अनेकदा गेम्स, कार्टून, जाहिराती यांचा सुळसुळाट असतो. यामध्ये मुलांचे लक्ष विचलित करणाऱ्या जाहिराती येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासा व्यतिरिक्त अन्य गोष्टीकडे लक्ष केंद्रीत होत असल्यामुळे ऑनलाईन अभ्यास पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
हे देखील वाचाच - परभणीत वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा ‘दिवाळी दान महोत्सव’
आर्थिक परिस्थितीमुळे स्मार्टफोनला नकार
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणारे असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थीती जेमतेम असते. आठ ते दहा हजार रुपयांचा स्मार्टफोन विद्यार्थ्यांला देण्यासाठी त्यांचा नकार असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेवू शकत नाही.
दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात
आॅनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर तरी विद्यार्थ्यांना आॅफलाईनपद्धतीने शिकता यावे म्हणून शाळा सुरु करणे आवश्यक आहे.
- सुधाकर पाटील बामणीकर (पालक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.