E Learning Education facilities for students sakal
नांदेड

विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमधून शैक्षणिक सुविधा

डॉ. मिलिंद भोई : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : पुण्यजागर प्रकल्पाच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच व्यवसायीक दृष्टीकोनातून माहिती देण्यात येणार आहे. या इ-लर्निंग प्रकल्पाची सुरुवात लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अशी माहिती भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी रविवारी केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, टॅब देण्यात आले. या ई-लर्निंगच्या माध्यमातून पुण्यातील विविध विषयातील तज्ञ शिक्षक तसेच साहित्य चित्र कला क्रीडा नृत्य आदी विषयातील तज्ञ या मुलांशी वर्षभर संवाद साधणार आहेत.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात तंत्रशाळा हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी पुण्यातील सेवा निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल गुंजाळ, शिक्षण तज्ज्ञ आर्चिता मडके, डॉ. वैभव पूरंदरे, डॉ. ऋषीकेश आंदळकर, दत्ता टोकलवाड, प्रतिक गाडे आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी गूणवंत विरकर गजानन मेटकर, शेख साबेर, शंकर ढगे, जगन्नाथ शेटे, सुरेश वळसे यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT