nandedearthquake Sakal
नांदेड

Nanded Earthquake : नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi), सकाळ वृत्तसेवा

Nanded: नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.5 व 3.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही.

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Amazon Layoffs : मे महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांची कपात! 3 महिन्यांत पुन्हा नोकरकपात; AI मुळे नोकऱ्यांवर संकट?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

SCROLL FOR NEXT