File photo 
नांदेड

नांदेड : शिक्षण सम्राटांची शक्कल, पदभरतीसाठी मिळवला जातोय अल्पसंख्यांक दर्जा 

प्रमोद चौधरी

नांदेड : वर्षानुवर्षापासून सामान्य शैक्षणिक संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. परंतु, शासनाने कर्मचारी भरतीसंबंधी नवीन निकष तयार करून कर्मचारी भरतीची पूर्वपरवानगी घेण्याची पद्धत अमलात आणल्यामुळे जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांनी सामान्य शैक्षणिक संस्था अल्पसंख्यांक संस्थांमध्ये परिवर्तित करण्याचा नवा गोरखधंदा सुरु केला आहे. 

महाराष्ट्र शासनाने खासगी संस्थांमधील कर्मचारी भरतीसंबंधी निर्माण केलेल्या जटील निकषांची अमलबजावणी करणे कठीण जात आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून अल्पसंख्यांक हा नवा फंडा अमलात आणला गेला आहे. कर्मचारी भरतीवर बंदी टाकल्यामुळे संस्थाचालक अडचणीत आले आहेत. अनेक वर्षापासून सामान्य संस्था म्हणून कार्य करणाऱ्या संस्थापकांनी अल्पसंख्यांकामध्ये परिवर्तित करून कर्मचारी भरतीचा नवीन उपाय शोधून काढला आहे. 

यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याची गोपनीय माहिती आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत रॅकेटच्या माध्यमातून काम केले जात असल्याचीही अधिकृत माहिती मिळाली आहे. वर्षानुवर्षे ज्या शैक्षणिक संस्था सामान्य संस्था म्हणून कार्यरत होत्या. त्या संस्था अलीकडच्या काळात अचानक अल्पसंख्यांक झाल्या आहेत. ही बाब आता पदभरतीच्या सुरु झालेल्या प्रक्रियेतून दिसून येत आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये कर्मचारी भरती अद्यापही सुरु आहे. जिल्ह्यात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून अनेक शिक्षक अतिरिक्त असताना देखील अल्पसंख्यांक शाळेमध्ये कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरुच असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 

हे देखील वाचाच - नांदेडकरांनो सावधान - इंग्लडहून परतलेल्या दोन पैकी एका प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह
  
अतिरिक्त शिक्षकांचा वांधा
अतिरिक्त शिक्षकांच्या बाबत माहिती जाणून घेतली असता, त्यांना परवानगी घ्यावी लागत नसल्याचे सांगण्यात आले. अल्पसंख्यांक शाळा असो की सामान्य शाळा एकसारख्या शैक्षणिक पात्रताधारण करणाऱ्या शिक्षकांची गरज असते. अशा शिक्षकांना शासनच वेतन देते. याचा अर्थ जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा अल्पसंख्यांक शाळांमध्ये समायोजन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय अल्पसंख्यांक शाळांचा कर्मचारी नियुक्तीचा गोरखधंदा बंद होणार नाही. त्याला आळाही बसणार नाही, असे मत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT