File photo 
नांदेड

शिक्षणसंस्था चालकांवर शाळा सुरु करण्याचा पेच, कसा?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन झाल्याने शाळा, महाविद्यालयांसह कोचिंग क्लासेसही मार्चपासून बंदच आहेत. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते, मात्र यंदा झाली नाही. 

शाळा सुरू करण्यावर सरकारचा भर आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी शाळा सॅनेटाइज करण्याचे आदेश सरकारने शाळांना दिलेले आहे. यानुसार, एका शाळेला सॅनेटाइज करण्यासाठी किमान एक हजार ५०० रुपयांचा खर्च येणार आहे. शाळा किमान दोनशे दिवस सुरू राहिल्यास हा दहा ते बारा लाखांचा खर्च पेलायचा कसा? असा प्रश्‍न आता शाळांसमोर उभा ठाकला आहे.

टप्प्याटप्प्याने सर्वच वर्ग सुरु करणार
जुलै महिन्यात नववी ते बारावीच्या शिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये सहावी ते आठवी आणि त्यानंतर सप्टेंबरपासून तिसरी ते पाचवीचा विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होईल. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, त्या भागातील शाळा संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सुरू करावयाच्या आहेत. त्यासाठी या परिसरातील शाळा सॅनिटाइज करणे आणि आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीचा संपूर्ण खर्च खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायमविना अनुदानित शाळांना स्वत:च्या खिशातून करावयाचा आहे. एकीकडे पालकांकडून शुल्क मिळाले नसल्याने आधीच कर्मचारी आणि शिक्षकांचे पगार देता येणे शक्‍य होत नसल्याचे दिसून येते. मात्र, दुसरीकडे हा अतिरिक्त खर्च लागल्यास शाळांनी एवढा पैसा आणायचा कुठून? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

असा होईल खर्च
एक शाळा आणि एक बस सॅनिटाइज करण्यासाठी दहा लिटर सल्फर हायफोक्‍लोराइड आणि एक कॅन सॅनिटायजरची गरज पडते. त्यासाठी किमान एक हजार ५०० रुपये लागतील असा अंदाज आहे. दिवसातून दोन शिफ्ट झाल्यास चार वेळा शाळा सॅनेटाईज करावी लागणार आहे. त्यामुळे हा खर्च चौपट होतो.  

सॅनिटायजेशनची सोय करावी किंवा निधी द्यावा
एकाच दिवसाचे किमान एक हजार ५०० रुपये सॅनिटायझेशनचा खर्च येत असल्यास तो पैसा सामान्य शाळा संचालकांनी आणायचा कुठून? एकीकडे शुल्कवसुली न केल्याने शिक्षकांना नियमित पगार देणे अशक्‍य झाले आहे. सरकारने किमान सॅनिटायजेशनसाठी सोय करून द्यावी; अथवा निधी द्यावा.
- शशिकांत धानोरे 

मोठा पेच निर्माण झाला
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी, जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा घेण्याची जबाबदारी संस्थाचालकांवर असल्याने शाळा सुरु कशा कराव्यात? असा पेच त्यांच्यासमोर सध्या आहे.
- सदाशिव सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT