विद्यूत तारा व खांब शेतात पडून 
नांदेड

वादळांनी पडलेली विद्युत खांबे जमिनीवर पडून; विद्यूत मंडळाचे दुर्लक्ष

सध्या या परिसरात पेरणीचे कामे चालू आहेत. या पडलेल्या खांबा व तारामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. पेरणी करतेवेळी जमिनीवरचे तार बाजूला करुन शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागत आहे.

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ हे गाव तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असून या गावात सिंचनाच्या चांगल्या सुविधा असून या परिसरात धान पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. या धान पिकाला पाण्याची गरज जास्त असल्याने या परिसरात गेल्या दहा दिवसा खाली मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने या परिसरातील शेतातील विजेचे खांबे जमीनदोस्त झाले आहेत. त्या विजेच्या खांबावरील तार हे आजही जमिनीवर पडून आहेत.

सध्या या परिसरात पेरणीचे कामे चालू आहेत. या पडलेल्या खांबा व तारामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. पेरणी करतेवेळी जमिनीवरचे तार बाजूला करुन शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागत आहे. अप्पारावपेठ येथे धान पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. आता धान रोहिणीचे काम चालू होतात धांन लावगड करते वेळेस शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते. त्यामुळे धान रोवणीच्याच्या कामात विजेची गरज भासते पंधरा दिवसापासून खांब व विजेचा जमिनीवर पडून आहेत.

हेही वाचा - महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की; वाईबाजार उपकेंद्रातील घटना

अप्पाराव पेठ येथील वायरमन यांच्याशी संपर्क केला असता मी वरिष्ठ अधिकारी यांना या बाबतीत माहिती दिली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की सध्या आपल्या परिसरात विद्युत खांब उपलब्ध नसून विद्युत खांबांची मागणी केली आहे. विध्युत खांब उपलब्ध झाले की विद्युत पुरवठा सुरळीत करु असे सांगितल्याचे वायरमन यांनी सांगितले. विद्युत मंडळाने विद्युत पुरवठ्याकडे लक्ष घालून त्वरीत वीज पुरवठा चालू करावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT