file photo 
नांदेड

शिवसंग्रामचा 13 फेब्रुवारीला नांदेड येथे एल्गार मेळावा : आ. विनायक मेटे यांची उपस्थिती राहणार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिवसंग्रामचा 13 फेब्रुवारीला नांदेड येथे एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असून शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी दिली. 

आघाडी सरकार मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयमध्ये टिकवू शकले नाही, मंगळवारी (ता. नऊ) सर्वोच्च न्यायालयाने परत पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी युवकांचे आयुष्य बरबाद होण्याची वेळ आली आहे, म्हणून आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी एल्गार मेळावा होत असल्याचे धांडे यांनी सांगितले. ता. 13 फेब्रुवारीच्या नांदेड येथील एल्गार मेळाव्यास मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना आघाडी सरकार व मंत्री सरकारमध्ये नोकर भरती करत घेत आहेत आणि सर्व ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांना कुठेच संधी मिळणार नाही. जाणीवपूर्वक अन्याय करण्याचे धोरण आघाडी सरकारने आखले आहे. म्हणून या सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या एल्गार मेळाव्यामध्ये सामील व्हावे असेही आवाहन त्यांनी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आले. या वेळीनितीन लाठकर, महिला आघाडी प्रमुख प्रेमलता पाटील शिंदे, सुरेश घोरबांड उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT