File Photo
File Photo 
नांदेड

एसटी कामगारांचे आक्रोश आंदोलन, थकीत पगारासाठी आपापल्या घरातच पुकारणार एल्गार 

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाच्या महामारीत आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाकडे कामगारांच्या वेतनासाठी कुठलीही तरतूद नाही. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तीन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित आहेत. पगार नसतानाही कामगार नियमितपणे कर्तव्य बजावत आहेत आणि एसटीची चाके धावती ठेवत आहे. मात्र उपाशी पोटी एसटीची चाके किती व कशी धावणार व कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने थकीत पगारासाठी एसटी कामगारांचे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

दसरा गेला आता दिवाळी आली. मात्र अद्यापही मागील तीन महिन्याचे वेतन नाही. थकित महागाई भत्त्याचे वाटप नाही. उत्सव अग्रिम नाही आणि दिवाळी उचलही नाही. अशा प्रचंड आर्थिक कोंडीत एसटी कामगार सापडलेला आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित वेतन मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. दिवाळीपूर्वी सर्व एसटी कामगारांना थकित वेतन, महागाई भत्ता, दिवाळी उचल देण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरतील कामगारांनी आपल्या कुटुंबियांसह घरातच आक्रोश आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीने घेतलेला आहे. यासंदर्भात दोन नोव्हेंबरला जिल्हाधिकारी तहसीलदार व स्थानिक आमदार-खासदारांना निवेदन देण्याचा निर्णय पण घेण्यात आलेला आहे. 

लोकप्रतिनिधींना आक्रोश आंदोलनाचे निवेदन

शनिवारी (ता.३१) नांदेड येथे विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी, तहसिलदार व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासंदर्भात व आक्रोश आंदोलन करण्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दोन नोव्हेंबर २०२० ला प्रत्येक आगारात व नांदेड विभागात संघटनेचे पदाधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना प्रलंबित वेतन संदर्भातील निवेदन देणार आहेत व नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून या सर्व लोकप्रतिनिधींना संघटनेच्या प्रतिनिधींनी मार्फत निवेदने देण्यात येणार आहेत . 

घरात राहुनच करा आंदोलन

तसेच (ता. नऊ) नोव्हेंबरला नांदेड विभागातील सर्व कामगार आपापल्या घरात व दारात कुटुंबासहित प्रलंबित वेतनासाठी आक्रोश आंदोलन करणार आहेत. या अभिनव पद्धतीने आक्रोश करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. या बैठकीला केंद्रीय उपाध्यक्षा शीला नाईकवाडे, विभागीय अध्यक्ष एम.बी. बोर्डे, विभागीय सचिव विनोद पांचाळ यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस गंगाधर मोगले, संजय मादास, दिगंबर कोंढे, फारुकी, रज्जाक, चव्हाण, मन्मथ स्वामी, चंद्रकांत पांचाळ, बडवणे, काझी यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT