engineer along with clerk arrested while taking bribe of Rs 6 lakh nanded crime marathi news esakal
नांदेड

Nanded Crime : अधीक्षक अभियंत्यासह लिपिक लाच घेताना ताब्यात

गुत्तेदाराकडून मागीतली होती सहा लाख ४० हजार रुपयांची लाच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : रस्त्याच्या कामाचे टेंडर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करण्यासाठी गुत्तेदराकदून सहा लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत, वरिष्ठ लिपिक विनोद केशवराव कंधारे यांच्याविरुध्द लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी राजपूत यांच्या घराची व कार्यालयाची झडती घेतली, तेव्हा रोख ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये आढलले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यांत रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगराव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड (ता.हदगाव, जि.नांदेड) या रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाले होते.

सुमारे 14 कोटी रुपयांचे काम होते. कामांच्या निविदा स्वीकृती शिफारशीसाठी तक्रारदार हे श्री. राजपूत यांना भेटले असता, दोन टेंडरचे 14 कोटी 10 लाख रुपये होतात. अर्धा टक्काप्रमाणे सात लाख रुपयांची मागणी श्री. राजपूत यांनी केली. पैसे दिले तर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करतो, असे त्यांनी गुतेदाराला सांगितले.

त्यानंतर तक्रारदार हे वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी व त्यांच्यासोबतचे लिपिक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25 हजार असे एकूण 50 हजार देण्याची मागणी केली. ही लाच असल्याचा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली.

दरम्यान बुधवारी (ता.एक) तक्रारदार यांनी पुन्हा श्री.राजपूत यांची भेट घेतली. सात लाख रुपये जास्तीचे होत आहेत, काही कमी करा, अशी विनंती केली. तेव्हा सहा लाख रुपयांत तडजोड झाली. कंधारे यांना प्रत्येक टेंडरचे प्रत्येकी 20 हजार असे 40 हजार देण्यास सांगितले.

एकूण सहा लाख 40 हजारात तडजोड झाली, बुधवारी (एक नोव्हेंबर) मध्यरात्री १२ ते एक वाजेच्या दरम्यान श्री. कंधार सहा लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.यानंतर पोलिसांनी श्री. राजपूत यांच्या कार्यालयाची व घराची झडती घेतली असता, दोन्ही ठिकाणाहून ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये पंचांसमक्ष जप्त केले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत

याप्रकरणी रात्री उशिरा राजपूत, कंधारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक गजानन बोडके, सहायक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, काॅन्स्टेबर ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, शेख अकबर, राजेश राठोड, अरशद खान, ईश्वर जाधव, गजानन राऊत, प्रकाश मामुलवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT