nanded sakal
नांदेड

Nanded : साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले ; सर्दी, ताप, खोकल्यामुळे हैराण,ज्येष्ठांमध्ये प्रमाण अधिक

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे दिवसभर उष्ण व सायंकाळी पुन्हा थंड वातावरण होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे दिवसभर उष्ण व सायंकाळी पुन्हा थंड वातावरण होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयात साथीचा आजारावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, कफ, पित्त होण्याचे प्रमाण आणि रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात एक दोन रुग्ण या साथीच्या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. तसेच या वातावरणात हिवताप, कावीळ, टायफाईड सारखे आजार होणारे रुग्णही वाढले आहेत. विशेष करून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. काही जणांना ताप उतरत नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

सध्या सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार येतात. रुग्णांनी घाबरण्याचे काही कारण नाही. डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून गोळ्या, औषधी घ्याव्यात. काही दिवस पथ्यपाणी सांभाळले तर हा आजार तीन ते चार दिवसात कमी होतो.

- डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

काय घ्यावी काळजी

  • साथीचे आजार होऊ नये म्हणून आपआपल्या घरातील आणि घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा.

  • सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

  • एकदम थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाऊ नयेत.

  • गरम, कोमट किंवा साधे पाणी प्यावे.

  • थंडी जाणवत असेल तर उबदार कपडे घालावेत.

  • सर्दीमुळे श्वसनाला त्रास होत असेल तर थंड वाऱ्यापासून काळजी घ्यावी.

  • कोमट पाण्यात हळद, मीठ टाकून गुळण्या कराव्यात.- कोमट दुधात हळद टाकून प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT