file photo 
नांदेड

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये सर्पमित्राकडून सापाला जीवदान

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील काबरानगर परिसरात प्राणीमित्र प्रसाद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच फूट लांबीचा विषारी भारतीय नाग महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला पकडुन त्याचे प्राण वाचवून परिसरातील नागरिकांनाही भयमुक्त केले. या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच जोखीम पत्करत कसरत करावी लागली. 

शहरातील काबरानगरमध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजे बुधवारी (ता. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास श्री. असोरे यांच्या घरी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरुनी रात्री साडेआकराच्या सुमारास एक मोठा साप पायऱ्यावरुन घराच्या दिशेने जातांना पाहिला. सापाचा आकार व आवाज ऐकून नागरिकांनी तो नाग असल्याचे ओळखले. सदर घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन तात्काळ शहरातील वन्यप्राण्यांच्या संवर्धन व संरक्षणात कायम तत्पर असणाऱ्या helping hands wildlife welfare या संस्थेचे प्राणीमित्र प्रसाद शिंदे यांना माहिती दिली. 

माहिती मिळताच प्रसाद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. रात्रीचे साडेअकरा वाजल्यामुळे अंधारात पायऱ्यांवरुन घरात जाणाऱ्या अत्यंत विषारी नागास सुरक्षितपणे पकडून  प्रसाद शिंदे यांनी भरणीत बंद केले. शहरात अश्या प्रकारचा मोठा नाग आढळणे अगदी दुर्मिळच म्हणता येईल. नागास भरणीत बंद करताच परिसरातील भयभीत नागरिकांचा जीव भांड्यात पडला. नागरिकांना सापांबद्दल माहिती देण्यात आली व त्यांना भयमुक्त करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने साप हे थंड निवारा शोधत मानवी वस्तीकडे येतात. अश्यावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता व त्यास कोणतीही ईजा न करता जवळील अनुभवी व जाणकार सर्पमित्रास पाचारण करावे असे आवाहन यावेळी प्रसाद शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

England Test Captain: इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? ECBच्या एका निर्णयाने वाढवलं सस्पेन्स,नेमकं कोणाचं नाव चर्चेत?

SCROLL FOR NEXT